ड्वेन ब्राव्होचा ‘चिकन डान्स’ बघितलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शारजाह

वेस्ट इंडीजचे खेळाडू हे त्यांच्या खेळासोबतच त्यांच्या नृत्यकौशल्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचे मैदानात नाचतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या वेस्ट इंडीजचा खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या ‘चिकन डान्स’चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सध्या शारजामध्ये टी10 लीग सुरू आहे. या लीगमध्ये ब्राव्हो हा मराठा अरेबियन्स संघाकडून खेळत आहे. मराठा अरेबियन्सच्या बेंगाल टायगर्स विरोधातील सामन्यात ब्राव्होन चार विकेट घेतल्या. यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबी याची विकेट घेतल्यानंतर ब्राव्हो नाचायला लागला. त्याच्या या नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.