रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या मजबुतीसाठी दररोज खा ‘हे’ फळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताजे, आंबट-गोड आणि रसदार संत्र तोंडाची चव वाढवते. बरेच जण हिवाळ्यात संत्र खाण्याचे टाळतात, मात्र ऋतुमानानुसार थंडीच्या दिवसांत दररोज संत्र खाणे आवश्यक आहे. संत्र्यामध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते शिवाय वजन कमी करण्यासाठी मदत होते. संत्र्यामध्ये कॅल्शियमही पुरेशा प्रमाणात असल्याने हाडांच्या मजबुतीकरिता संत्र खाणे आवश्यक आहे. याशिवाय जीवनसत्त्व ए, बी,सी, अॅमिनो अॅसिड, कॅल्शियम, आयोडिन, फॉस्फरस, सोडियम, मिनरल्स आणि फायबर्स हे घटक संत्र या फळात असतात. पाहुया दररोज 1 संत्र खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

रोगप्रतिकारक्षमता वाढते
जे लोक रोज संत्र खातात त्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढते तसेच अशा लोकांच्या सर्दी, पडसे आणि ताप या आजारांच्या तक्रारी कमी होतात. रोगप्रतिकारक्षमता वाढल्याने विषाणुंचा संसर्ग टाळायला मदत होते. यामधे असलेले जीवनसत्त्व सी आजारांचा प्रतिबंध करण्यास उपयुक्त ठरते.

अँण्टीऑक्सीडंटने समृद्ध
संत्र अँण्टीऑक्सीडंट गुणधर्माने समृद्ध आहे. संत्र्यामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड आणि बीटा कॅरोटीन असते. यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. रोज 1 संत्र खाल्ल्याने फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे रक्षण व्हायला मदत होते.

रक्तदाबावर नियंत्रण
रक्तदाबाशी संबंधित त्रास होत असल्यास दररोज 1 संत्र खा. यामुळे संत्र्यामधील औषधी गुणधर्म रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतात. शिवाय संत्र खाल्ल्याने रक्तदाबाची समस्याही कमी होते.

सांधेदुखीवर गुणकारी
संत्र खाल्ल्याने संधीवातावर आराम मिळतो. सांधेदुखी, जडपणा, सूज येण्याची समस्या कमी होते. संत्र खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. याचा फायदा गाउट झालेल्या रुग्णांना जास्त होतो. जळजळ होण्याची समस्या कमी होऊन आराम मिळतो.

वजनावर नियंत्रण
संत्र्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. संत्र्याचा समावेश स्नॅक्स फ्रूटमध्ये केल्यास शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. यासाठी दररोज दररोज एक ग्लास संत्र्याचा रस घेण्यानेही फायदा होऊ शकतो.