संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीचा युक्तिवाद पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी आपला युक्तिवाद पूर्ण केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ईडीची बाजू मांडली. त्यावर संजय राऊत यांचे वकील मंगळवारी सकाळी 11 वाजता युक्तिवाद करणार आहेत.

ईडीच्या विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मागील सुनावणीदरम्यान अपूर्ण राहिलेला युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सोमवारी पूर्ण केला. त्यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तिवादासाठी वेळ मागितला. त्यांच्या विनंतीला अनुसरून सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी त्यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता युक्तिवाद सुरू करण्यास मुभा दिली. सोमवारी जवळपास तीन तास सुनावणी चालली. यावेळी न्यायालयात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, भाऊ सुनील राऊत तसेच मुलगीही उपस्थित होती.