
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्या पाठोपाठ आता पत्नी नलिनी चिदंबरम यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मनी सारधा चीट फंड घोटाळ्या प्रकरणी समन्स बजावले आहे. नलिनी यांना या प्रकरणी २० जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
याआधी ईडीने या प्रकरणात नलिनी यांना २४ एप्रिल रोजी चौकशीसाठी येण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र नलिनी यांनी या समन्सविरोधात न्यायालयात याचिका दाखल करत कोणत्याही महिलेला चौकशीसाठी घराबाहेर बोलावले जाणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यावेळी न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमणियम यांनी नलिनी यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर न्यायालयाने ईडीला नव्याने समन्स पाठविण्याचे आदेश दिले होते.


























































