
इजिप्तमध्ये समलैंगिकता हा कलंक मानून त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाते. त्यामुळे या लोकांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात. आता पोलिसांनी गे लोकांना पकडण्यासाठी अनोखी मोहिम हाती घेतली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क डेटिंग अॅपवर नोंदणी केली आहे. त्यांमुळे इजिप्तमधील समलिंगी घाबरले आहेत.
इजिप्तमध्ये समलैंगिकतेविरुद्ध कोणताही स्पष्ट कायदा नाही. मात्र समलैंगिकता हा कलंक मानून अशा लोकांवर कारवाई केली जाते. इजिप्तमध्ये समलिंगीं लोकांना सार्वजनिकरित्या डेट करणे फार कठीण आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी डेटिंग अॅप हे चांगलं माध्यम आहे. त्यासाठी पोलिसांनी यांना पकडण्यासाठी आता वेगळी शक्कल लढवली आहे. पोलिसांनी ग्राहक बनून डेटिंग अॅपवर नोंदणी केली आहे. पोलीस समलैंगिक लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी खोटी प्रोफाईल तयार करतात. पोलिसांनी मॅट नावाच्या परदेशी तरुणासोबत ग्रींडर या डेटिंग अॅपवर संवाद साधला. मॅटला त्याच्यासमोर गे असल्याचेच त्यांनी भासवले. त्यानंतर मॅटने स्वत:चे आणि त्याच्या शरीरयष्ठीचे फोटो पाठवले. त्यानंतर मॅटला पोलिसांनी अटक केली.
अशाप्रकारे पोलीस ग्राहक बनून आणखी समलैंगिक लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर त्यांना अटक करतात. 2020 मध्ये, अहमद ताहेर, इंटरनेट गुन्हे आणि मानवी तस्करी खात्याच्या गृहमंत्र्यांचे माजी सहाय्यक यांनी अहल मसर या वृत्तपत्राला सांगितले: “आम्ही समूह सेक्स पार्टी, समलैंगिक मेळावे यांच्या लोकांना उघड करण्यासाठी आभासी जगात पोलिसांची भरती केली.”



























































