
दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या बहुप्रतीक्षित मेट्रो 2 अ मार्गावरील दुसऱया टप्प्याच्या कामात इलेक्ट्रिकल कामात दिरंगाई केल्याप्रकरणी चार कंत्राटदारांना 36 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून ही माहिती मिळवली.
एमएमआरडीएकडे मेट्रो कामाची सद्यस्थिती आणि पंत्राटदारांवर आकारलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती गलगली यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे मागितली होती. दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या मेट्रो 2 अ ही सेवा 31 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील दहिसर पूर्वपासून डहाणूकरवाडी ही सेवा 2 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आली आहे तर दुसरा टप्पा जानेवारी 2023 रोजी पूर्ण झाला. या मार्गाला 36 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, अशी माहिती कॉर्पेरेशनने दिली. त्याचबरोबर सिव्हिल कामात सुरक्षा उल्लंघन आणि साईटवर सुरक्षा सुधाराबाबतीत सुरक्षा दंड आकारला आहे. पण त्याची माहिती कॉर्पोरेशनने दिलेली नाही.
चार कंत्राटदार दोषी
इलेक्ट्रिकल कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत 36 लाखांचा दंड आकारला आहे. यात माविन स्विचगर्स अँड पंट्रोल या कंत्राटदाराला 4.44 लाख रुपये, स्टार्ंलग अॅण्ड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक या कंत्राटदाराला 1.50 लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदाराला 1.53 लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदाराला 28.54 लाख रुपये इतका दंड आकारला आहे, अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने दिली.




























































