वीज बिल वसुलीला विरोध करणाऱ्यांवर कडक कारवाई, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणने राज्यात सध्या थकीत वीज बिल वसुलीची मोहिम सुरु केली असून त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वीज बिल वसुलीला विरोध केला जात असून वीज कर्मचारी, अधिकाऱयांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊन वीज बिल वसुलीमध्ये अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कडक करवाई केली जाईल अशा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.

थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे. भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकाऱयांना मारहाण करणे, त्यांच्या विज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या सत्ताकाळातील गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे, अशी टीकाही डॉ. राऊत यांनी केली आहे.

ग्राहकांनी वीज बिल भरण्यास विरोध करण्याएवजी सरकारने जाहीर केलेल्या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी भरावी असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा ऊर्जामंत्र्यांनी निषेध केला आहे.