
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टेरर फंडिग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) फुटीरतावाद्यांवर कारवाई केल्यानंतर आता त्यांचा मोर्चा कश्मीर खोऱ्यातील हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेकडे वळवला आहे. ईडीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या सात दहशतवाद्यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या सात दहशतवाद्यांची तब्बल 1.22 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्याने दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.
Enforcement Directorate (ED) attached 13 properties of Mohammad Shafi Shah & six other terrorists of Hizb-ul-Mujahideen worth Rs 1.22 Crores in an ongoing investigation under Prevention of Money Laundering Act, 2002 (PMLA). pic.twitter.com/f3EzKadGjS
— ANI (@ANI) March 19, 2019
कश्मीरमधील हिजबुलचा दहशतवादी मोहम्मद शफी शाह याच्यासह सात दहशतवाद्यांच्या जम्मू कश्मीरमधील 13 संपत्ती ईडीने जप्त केल्या आहेत. मोहम्मद शफी शाह हा हिजबुलला आर्थिक मदत मिळवून देत असतो. ईडीने ही कारवाई करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.
























































