म्हणे ३४ हजार २०० कोटी दिले! ५० टक्के शेतकर्‍यांनाही कर्जमाफी नाही : अंबादास दानवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer-loan

सामना प्रतिनिधी  । संभाजीनगर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यातील ९० टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आल्याचे केलेले विधान धक्कादायक आणि धुळपेâक करणार असून, या कर्जमाफीचा लाभ ५० टक्के शेतकर्‍यांनाही मिळालेला नाही, असे  स्पष्ट करीत शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची आकडेवारी आणि वस्तुस्थिती समोर आणत याच पर्दाफाश केला. दरम्यान शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ५ जानेवारीनंतर बँकासमोर शेतकर्‍यांची परिषदा घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहे. या संदर्भात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली. संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ६ हजार ३६ शेतकर्‍यांनी ७४ हजार ५०८ लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज सादर केली होते. त्यातील १ लाख ५ हजार ६३६ शेतकर्‍यांची ग्रीन लिस्ट आलेली असून त्यांची १९ हजार ४९८ लाख रुपये कर्जमाफी दिली जाणार आहे. म्हणजेच ५१.२७ टक्के शेतकर्‍यांचे नावे ग्रीनलिस्टमध्ये आली आहे. त्यांना दिली जाणारी कर्जमाफीची रक्कम २६.८९ टक्केच आहे, असे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांची आणि अपात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी जाहीर होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांमध्ये या कर्जमाफी बद्दल संभ्रम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले.

यावेळी शिष्टमंडळातील अनेकांनी शेतकर्‍यांची राष्ट्रीयकृत बँकेत कशी गोची केली जाते याचे अनेक उदाहरणे दिली. सरकारने २०१६ पुर्वीच्या कर्जधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी राष्ट्रीयकृत बँकां केवळ २०१६ साली घेतलेल्या कर्ज वगळता त्यापुर्वी घेतलेले कर्ज भरणा करा, असे शेतकर्‍यांना सांगत आहेत. याशिवाय त्यांना अपमानस्पद वागणूक दिली जात असल्याच्या अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकार्‍यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत, अश प्रकरणात आपल्याकडे तक्रार करा. त्यानुसार संबंधित बँक अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करु, असे आश्वासन यावेळी दिले.