भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

भाजप नेते आणि माजी अदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला नगर पुणे मार्गावर जबरदस्त अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहाणी झाली नसून पाचपुते व त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत.

पाचपुते हे नगरहून पुण्याला जात असताना नगर पुणे मार्गावरील शरदवाडी परिसरात त्यांच्या गाडीने ट्रकला धडक दिली. रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात गाडीच्या बोनेटचा चक्काचूर झाला आहे.