
चित्रकला व शास्त्रीय कला प्रकारात पात्र विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेतील सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इंटरमिजिएट परीक्षेतील पात्र विद्यार्थीही या मुदतीत प्रस्ताव पाठवू शकतात. पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात प्रमाणपत्राच्या साक्षांकित छायाप्रतीसह 6 जूनपर्यंत शिक्षण मंडळाकडे आपले प्रस्ताव सादर करायचे आहेत. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत वाढीव गुणांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे एकही पात्र विद्यार्थी सवलतीच्या गुणांपासून वंचित राहू नये यासाठी शाळांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.



























































