इंन्स्टाग्राम, फेसबुकवर आता थ्रीडी अवतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्राम, फेसबुकवर युजर्ससाठी खूशखबर आहे. कारण इन्स्टाग्राम स्टोरी आणि डायरेक्ट मेसेजमध्ये थ्रीडी अवतार पाठवता येणार आहे. सध्या हे फीचर फक्त अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोसाठी लाँच करण्यात आले आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी आणले जाईल. फेसबुकवरही हे नवे फीचर येणार आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना तुम्ही थ्रीडी ग्राफिक्स वापरू शकता. यामध्ये अनेक कॅरेक्टरचे थ्रीडी अवतार समाविष्ट करण्यात आले आहेत. कॅरेक्टरशिवाय इतर गोष्टींनाही थ्रीडी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फेसबुक मेसेंजरमध्येही लवकरच हे फीचर मिळणार आहे. फेसबुकवर अनेक थ्रीडी स्टिकर्स मिळतील. मेटा कंपनी भविष्यातील मेटाव्हर्स प्रोजेक्ट लक्षात घेऊन अॅपमध्ये अपग्रेड आणि बदल करण्यावर अधिक भर देत आहे. मेटा कंपनी इन्स्टाग्रामसाठी आणखी काही फीचर्सवर काम करत आहे.