
बनावट दस्त ऐवज बनवून औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दिनकर नाना खेडकर, गणेश बापूराव खेडकर, कॅशिअर राजेंद्र शहादेव दौंड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भगवानगड परिसर औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष लिंबाजी नाना खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
संस्थेच्या नावाने खरवंडी कासार येथे जमीन खरेदी केलेली होती. खरवंडी कासार येथीलच वसंतराव नाईक ग्रामीण पतसंस्थेचा सचिव गणेश खेडकर याने पतसंस्थेच्या लेटरपॅडचा गैरवापर करत बनावट दस्तावेज तयार करत संस्थेचे अध्यक्ष दिनकर नाना खेडकर यांना औद्योगिक संस्थेच्या भूखंडाचे व्यवहार करण्यास अनुमती दिली. 14 ऑगस्ट 2019 रोजी दिनकर खेडकर यांनी पतसंस्थेचा कॅशिअर राजेंद्र दौंड याला संस्थेच्या मालकीच्या भूखंडातील प्लॉट साडेतीन लाखांना विकला. या व्यवहारातून जमा झालेली रक्कम औद्योगिक संस्थेच्या खात्यात न भरल्याने लिंबाजी खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.


























































