
पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका घोळसगावसह तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला आहे. घोळसगाव, बोरगाव, बादोले, किणीवाडी, किरनळी यांसह वागदरी व किणी मंडळातील अनेक भागांत शेतकऱयांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन, उडीद पिकाला मोठा फटका बसला असून, काही शेतकऱयांवर उभे पीक सोडून देण्याची अथवा ट्रक्टर चालवून पीक काढून टाकण्याची वेळ आली आहे.
पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च करूनही अपेक्षित पाऊस नसल्यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. काही शेतकऱयांना उत्पादनातून पेरणीचा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः सोयाबीन, उडीद पिकाला याचा मोठा फटका बसला असून, काही शेतकऱयांवर उभे पीक सोडून देण्याची अथवा ट्रक्टर चालवून पीक काढून टाकण्याची वेळ आली आहे. मेहनतीनंतर उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्याने शेतकऱयांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पाच एकर सोयाबीनवर ट्रक्टर चालवताना मनाला दुःख झाले. मेहनत करून जपलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट करावे लागले. पिकासाठी केलेला बियाणे व खताचा खर्चही निघणार नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी.
– पंडित बादोले, शेतकरी, घोळसगाव




























































