
शेतात पिकवलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत नेण्यासाठी टेम्पोत कांद्याच्या गोण्या टाकत असताना कांद्याची एक गोणी छातीवर पडल्याने बेशुद्ध झालेल्या शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील रुईछत्तीसी येथे गुरुवारी सकाळी घडली. भाऊसाहेब उर्फ नाथा धर्मा गोरे (वय 45) असे या मयत शेतकर्याचे नाव आहे. मयत भाऊसाहेब गोरे यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली होती. हा कांदा गोण्यांमध्ये भरून त्यांनी शेतात ठेवलेला होता. गुरुवारी (दि.7) नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव असल्याने त्यांनी कांदा विक्रीला नेण्यासाठी टेम्पो बोलावला.
सकाळी ६ च्या सुमारास ते शेतातील कांद्याच्या गोण्या उचलून टेम्पोत टाकत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले, त्यांच्या डोयावरील कांद्याची गोणी त्यांच्या छातीवर पडून ते दबले गेले व बेशुद्ध पडले. त्यांचे चुलत भाऊ प्रवीण गोरे व इतरांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र सकाळी 7.20 च्या सुमारास डॉटरांनी त्यांना औषधोपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्यांच्यावर दुपारी रुईछत्तीसी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत भाऊसाहेब गोरे यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. या मृत्यूप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



























































