
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात सलग सहाव्या दिवशी शेतकर्यांनी आंदोलन केले. पंजाब आणि हरयाणामध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक जोर दिसला. मंगळवारी पंजाबाम्ध्ये शेतकर्यांनी रेल्वेवे रुळावर धरणे आंदोलन केले.
पंजाबच्या देवीदासपुरा भागात किसान मजदूर संघर्ष समितीकडून आंदोलन सुरू आहे. समिती गेली 6 दिवस रेल्वे रुळावर धरणे आंदोलन देत आहेत. जो पर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असे सुरूच राहणार असे आंदोलक शेतकर्यांनी म्हटले आहे.
Punjab: ‘Rail Roko’ agitation in Amritsar, by Kisan Mazdoor Sangharsh Committee -against #FarmBills (now laws), enters 6th day. Visuals from Devidaspura village.
“On Oct 1, we’ll announce mass agitation together with others across the nation,” says Committee’s General Secretary pic.twitter.com/pdjn1EApzM
— ANI (@ANI) September 29, 2020
1 ऑक्टोबर रोजी शेतकर्यांनी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी इतर राज्यांचे शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
25 सप्टेंबर रोजी शेतकर्यांनी हिंदुस्थान बंदची हाक दिली होती. या दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या गावी जाऊन आंदोलन केले. पंजाब सरकार या विधेयकाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. तसेच इतर काँग्रेस शासित राज्यात हा कायदा लागू न करण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव्व आणण्याचा विचार सुरू आहे.
























































