वडील मॅराडोनासोबत चमकले तर मुलगा मेस्सीसोबत गाजतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जेंटिनाने बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या लढतीत पोलंडवर 2-0 असा विजय मिळवत यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजला मारली. या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱया अलेक्सिस मॅकअलिस्टरचे आपल्या संघाशी दोन पिढय़ांचे नाते आहे. अलेक्सीसचे वडील कार्लोस मॅकअलिस्टर अर्जेंटिनाच्या महान सुपरस्टार दिएगो मॅराडोनासोबत बोका ज्युनियर्स आणि अर्जेंटिना संघातून खेळले आहेत. त्यांना पाहताच अलेक्सीस मोठा झाला आणि राष्ट्रीय संघात त्याने स्थान मिळवलंय. आपले वडील महान मॅराडोनासोबत तर आपण स्वतः सुपरस्टार मेस्सीसोबत देशासाठी मैदानात उतरतोय याचा वंशाने आयरीश असणाऱया अलेक्सीसला मोठा अभिमान आहे. पोलंडविरुद्धच्या लढतीत अलेक्सीसने उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच 46व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला.