
सिद्धार्थ आनंदच्या आगामी फायटर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अभिनीत असलेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
या टीझरमध्ये हवाई विमानांचे थरारक सीन, चित्रपटातील अॅक्शन आणि रोमान्सने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवत आहेत. फायटर चित्रपट गृहात सुपरहिट ठरणार यात शंका नाही. सिद्धार्थच्या शेवटच्या ब्लॉकबस्टर ‘पठान’च्या बरोबर एक वर्षानंतर हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.



























































