फिल्मफेअर पुरस्कारांत ‘थप्पड’ ठरला सर्वोत्कृष्ट! इरफान खान, तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट कलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिल्मफेअर पुरस्कारांत तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला असून याच चित्रपटासाठी ती सर्वोत्कृष्ट नायिका ठरली आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानला ‘अंग्रेजी मीडियम’मधील भूमिकेसाठी फिल्मफेअरने गौरविले आहे. इरफानचा सन्मान मुलगा बाबील याने स्वीकारला.

…आणि विजेते आहेत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ओम राऊत (तानाजी), सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा), सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स) – अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो), सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – राजेश कृष्णन (लूटकेस), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सैफ अली खान (तानाजी), सहाय्यक अभिनेत्री – फारुख जाफर (गुलाबो सीताबो), सर्वोत्कृष्ट गायिका – असीस कौर (मलंग), सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक – राघव चैतन्य (थप्पड), सर्वोत्कृष्ट संगीत – प्रतिम (लुडो)