
परळी शहरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेला शनिवारी सकाळी अचानक आग लागली.यामुळे मोठे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. सुभाष चौकात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याची माहिती खाली असलेले दुकानमालक चव्हाण आणि फुलझळके यांनी अग्निशमन दलाला दिली.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी औष्णिक विद्युत केंद्र व नगरपालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले.त्यांनी ही आग आटोक्यात आणली.मात्र या लागलेल्या आगे मुळे बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची समजते शाखा व्यवस्थापक कक्ष तसेच त्याच्या बाजूला असलेल्या सर्व्हर रूम मध्येही आग झपाट्याने पसरल्याने येथील साहित्य व सर्व कागदपत्रे जळून खाक झाले.या आगीमुळे बँकेच्या स्ट्रॉंग रूमचे नुकसान झालेले नाही. चौथा शनिवार असल्याने बँक बंद होती, त्यामुळे मोठी दुर्घटना घळली आहे.



























































