अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । बदलापूर

मासेमारी करण्यासाठी चार तरुण गुरुवारी रात्री बॅरेज धरणात गेले. पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. एका चौथऱ्यावर ते कसेबसे उभे राहिले. ही घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदुताप्रमाणे धाव घेतली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत चारही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.

बदलापूरच्या खरवई भागात राहणारे विनोद डीके, सागर गिरी, मनीष चौधरी, प्रथम भगज हे चौघेजण मासेमारीसाठी गेले होते. त्यांना पोहताही येत नव्हते. पाण्याची पातळी वाढत गेल्याने घाबरून हे तरुण चौथऱयावर जाऊन बसले. तोपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले होते. अग्निशमन दलाला याबाबतची बातमी मिळताच फायर ऑफिसर आर.बी. पाटील, लिडिंग फायरमन प्रदीप जाधव, नंदा भोपी, शैलेश जगताप, विनायक पाटील, स्टिफन मेहेत्रे आदींच्या पथकाने तातडीने बॅरेजकडे धाव घेतली. पाण्यात अडकलेल्या या तरुणांना लवकरात लवकर बाहेर काढणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन अग्निशमन जवानांनी बोटींच्या सहाय्याने मुलांचा शोध सुरू केला.