Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात होणार 102 जागांसाठी मतदान, वाचा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहेत. देशभरात 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या 102 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान या दिवशी पार पडणार आहे.

या वेळी लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांत मतदान होईल. दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे, सहावा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जून असा असेल. तर मतमोजणी 4 जून रोजी होईल.

यातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत 102 जागांवर मतदान होईल. त्यात अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीप, जम्मू कश्मीरचे उधमपूर, छत्तीसगढचं बस्तर, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम इथे प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. त्याखेरीज मेघालयमधील शिलाँग आणि तुरा येथेही मतदान होईल. मणिपूर इथल्या दोन जागांसाठीही 19 एप्रिलला मतदान होईल.

याखेरीज अरुणाचल प्रदेशच्या दोन जागांसाठी, आसामच्या दिब्रुगढ, जोरहाट, काझीरंगा, लखीमपूर आणि सोनितपूर जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होईल. त्याखेरीज बिहारच्या औरंगाबाद, गया, जमुई आणि नवादा जागेवरही 19 एप्रिल रोजी मतदान होईल. मध्य प्रदेशमधील छिंदवाड़ा, बालाघाट, जबलपुर, मंडला, सीधी आणि शहडोल या जागांसाठी तर महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, रामटेक आणि नागपूर येथे मतदान पार पडेल.

राजस्थानमधील गंगानगर, बीकानेर, चूरू, झुंझुनू, सीकर, जयपुर ग्रामीण, जयपुर, अलवर, भरतपुर, करौली-धौलपुर, दौसा आणि नागौर इथे मतदान होईल. तर उत्तर प्रदेशच्या सहारनपुर, कैराना, मुजफ्फरनगर, बिजनोर, नगीना, मोरादाबाद, रामपुर आणि पिलीभीत या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होईल.

तामिळनाडूत सर्वाधिक म्हणजे 39 जागांवर हे मतदान होणार आहे. त्यात तिरुवल्लुर, चेन्नई उत्तर, चेन्नई दक्षिण, चेन्नई सेंट्रल, श्रीपेरंबदूर, कांचीपुरम, अराक्कोनम, वेल्लोर, कृष्णागिरी, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, अरणी, विलुप्पुरम, कल्लाकुरिची, सलेम, नामक्कल, इरोड, तिरुप्पुर, नीलगिरी, कोयंबटूर, पोलाची, डिंडीगुल, करूर, तिरुचिरापल्ली, पेरम्बलूर, कुड्डालोर, चिदम्बरम, मयिलादुथुराई, नागपट्टिनम, तंजावुर, शिवगंगा, मदुरै, थेनी, विरुधुनगर, रामनाथपुरम, थूथुक्कुडी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी यांचा समावेश आहे.