फोल्डिंगच्या जिन्याची कमाल, नगरच्या पठ्ठय़ाची क्रिएटिव्हिटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरात फॅब्रिकेशनचे काम करणाऱया कारागीरांनी अफलातून क्रिएटिव्हिटी दाखवत फोल्डिंगचा जिना बनवला आहे. या जिन्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

दरबार फॅब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांन नगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोरील अरुंद गल्लीत पहल्डिंगचा जिना बनवला. जो पह्ल्ड करून भिंतीला लावता येतो. जेव्हा जिन्याचा वापर करायचा असेल, तेव्हा तो काढता येईल. इतर वेळी भिंतीला लॉक करता येतो. त्यामुळे या रस्त्यावरील जागा ये-जा करण्यासाठी उपयोगी पडते. जिन्याला 12 पायऱया असून तो बनवण्यासाठी 20 हजार रुपये खर्च आला. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी जिन्याचा व्हिडिओ शेअर केला.