
सामना प्रतिनिधी, मुंबई
नागरिकांच्या आहार आणि आरोग्याच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्स नियम 2011मध्ये काही सुधारणांसाठीचा प्रस्ताव मांडला आहे.
सर्व तेल व स्निग्ध पदार्थांमधील ट्रान्स फॅटी अॅसिडचे प्रमाण 2021 सालापर्यंत 2 टक्क्यांहून जास्त नसावे व जानेवारी 2022 पर्यंत 2 टक्क्यापर्यंत मर्यादित असावे यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे. 2023 पर्यंत औद्योगिक स्तरावर ट्रान्स फॅटी अॅसिड्सचे उत्पादन जगभरातून नाहीसे व्हावे, अशी हाक जागतिक आरोग्य परिषदेने दिली आहे.
या प्रस्तावात काही त्रुटी असून यात स्निग्ध पदार्थांव्यतिरिक्तही अन्नपदार्थांचा समावेश हवा अशी अपेक्षा ‘दिशा फाऊंडेशन’च्या संचालक डॉ. अंजली बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली.





























































