भगतसिंह कोश्यारी आज गाशा गुंडाळून डेहराडूनला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पायउतार व्हावे लागलेले मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱयांनी निरोप दिला. उद्या शुक्रवारी नौदलाकडून त्यांना मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते डेहराडूनला रवाना होतील.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत सतत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्या उचलबांगडीसाठी विरोधकांनीही रान उठवले होते. त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱयादरम्यान कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मान्य करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली  राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱयांनी आज मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना  निरोप दिला. शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते डेहराडूनकडे रवाना होतील.