जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. शरद यादव यांच्या निधनाला त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद यादव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची कन्या सुभाषिनी शरद यादव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शरद यादव यांच्या निधनाची माहिती दिली आहे. देशातील काही महत्वाच्या समाजवादी नेत्यांमध्ये शरद यादव यांची गणना होते.