माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. जसवंत सिंह हे सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या नेत्यांपैकी एक आहेत.

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘जसवंत सिंह यांनी सुरुवातीला एक जवान म्हणून व नंतर नेते म्हणून देशाची सेवा केली आहे. अटलजींच्या मंत्रीमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली असून अर्थ, संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयात त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या निधनाने दुखी झालो आहे.’, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या