
सामना ऑनलाईन । बंगळूरू
सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्झी इन्व्हेसमेंट घोटाळ्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना बेंगळुरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला अवैध पद्धतीने पैशांच्या अफरातफरीत मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यांचा सहकारी महफूज अली खान यालाही अटक करण्यात आली आहे. रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Janardhan Reddy who was arrested by Bengaluru Central Crime Branch, in connection with Ambident Group alleged bribery case has been sent to judicial custody till November 24. pic.twitter.com/YrIBxCQWfJ
— ANI (@ANI) November 11, 2018
रेड्डी यांना अटक करण्याबाबत गुन्हे शाखा विचार करत होती, शनिवारी रेड्डी शाखेच्या कार्यालयासमोर हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे रेड्डी यांना अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी अलोककुमार यांनी सांगितले. अटक केल्यानंतर रेड्डी यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ऐम्बिडेंट प्रकरणी रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणातील पैसे जप्त केल्यानंतर गुतंवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी डीसीबी एस. गिरीश यांना हटवण्याची मागणी रेड्डी यांनी केली होती. गिरीश यांना सर्तकता आणि सखोल चौकशीसाठी ओळखले जाते. त्यामुळे चौकशीचा धसका घेतलेल्या रेड्डी यांनी केलेल्या मागणीत काहीही तथ्य नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
























































