Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘9 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, August 9, 2023)
घरात नवीन शोभेच्या वस्तू घेण्याकरिता पैसे खर्च होतील. मनातील नकारात्मक विचार दूर करा. कुटुंबात प्रेमाचे, सलोख्याचे वातावरण असेल. करियरमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गरिबांना फळे वाटा. आराध्यदेवतेचे स्तोत्र वाचा.
शुभरंग : मोती

वृषभ (TAURUS – Wednesday, August 9, 2023)
नाती जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्यातील कौशल्याचा योग्य ठिकाणी वापर करण्याची संधी मिळेल. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका. आरोग्याची काळजी घ्या. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Wednesday, August 9, 2023)
धन लाभाचा योग आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची चिन्हे दिसतील. कुटुंबीय सुखी-समाधानी असतील. अनोळखी लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. आवडीच्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER – Wednesday, August 9, 2023)
शत्रूंपासून सावध राहा. पैसे देवाणघेवाणीचे आर्थिक व्यवहार जपून करा. कोर्टाचे व्यवहार जपून करा. सकारात्मक राहून निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करणे योग्य नाही. गरिबाला गहू आणि गुळाचे दान द्या.
शुभरंग : निळा

सिंह (LEO -Wednesday, August 9, 2023)
तुमचे ज्ञान आणि माहिती यांचा योग्य ठिकाणी वापर कराल. धनप्राप्तीचे योग आहेत. कुटुंबातील लहान मुलांची प्रगती होईल. आळस दूर सारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. देऊळ, मठ या ठिकाणी अन्नदान करा.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Wednesday, August 9, 2023)
गायील पोळी खाऊ घाला. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. जमिनीविषयी व्यवहार करताना काळजी घ्या. मनातील नकारात्मक विचार दूर करा. नात्यात मधुरता वाढेल.
शुभरंग : आकाशी

तूळ (TULA- Wednesday, August 9, 2023)
मित्रांची मदत मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे लक्षात ठेवा. आरोग्य चांगले राहिल. गरिाबांना तांदूळ दान करा.
शुभरंग : गुलाबी

वृश्चिक ( SCORPIO -Wednesday, August 9, 2023)
खर्चावर नियंत्रण ठेवा. धनप्राप्तीचे मार्ग शोधावे लागतील. कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. मानसिक त्रास दूर होतील. दूरच्या प्रवासाचा फायदा होईल. गुळाचे दान करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियांचे म्हणणे विचारात घ्यावे लागेल.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS -Wednesday, August 9, 2023)
आपल्या विचारांमुळे लोकं प्रभावित होतील. कामात व्यस्त राहाल. करियरवर लक्ष केंद्रित करावं लागेल. स्वत:साठी वेळ काढाल. घरातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. कबुतरांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : केशरी

मकर ( CAPRICORN – Wednesday, August 9, 2023)
आर्थिक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वपूर्ण व्यक्तिसोबत संभाषण होण्याची शक्यता आहे. उधार घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. सकाळी तुळशीला पाणी घाला.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, August 9, 2023)
आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. धनलाभाची शक्यता आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. पिठात गूळ घालून मुंग्यांना खाऊ घाला. छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. मनातील ईच्छा पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Wednesday, August 9, 2023)
आळस सोडून कामाला लागा. दिवसभर कामात व्यस्त राहाल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या सल्ल्याने काम कराल. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. शिवपिंडीवर अभिषेक करून बेलपत्र वाहा.
शुभरंग : चंदेरी