
सामना ऑनलाईन । मुंबई
रितेश देशमुखचा माऊली चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चित्रपटातील गाणीही लोकांना आवडली आहे. या चित्रपटाचे नवीन गाणे धुवून टाक हे गाणे युट्यूबर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री जीनीलिया देशमुख हिने इन्स्टाग्रामवर धुवून टाक हे कॅप्शन देऊन गाणे शेअर केले आहे.
या गाण्यात स्वतः जीनीलियाने रितेश सोबत ठेका धरला असून, चित्रपटाला अजय अतुलने संगीत दिले आहे. एका दिवसात युट्युबवर हे गाणे चार लाखहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.



























































