
घाटकोपर ते वर्सोवा धावणार्या मुंबई मेट्रा वनने कोरोना काळापूर्वीची प्रवासी संख्या गाठण्याच्या दिशेने आगेकूच केले आहे. सध्या मेट्रो वनने दररोज 3 लाख 15 हजार प्रवासी प्रवास करीत असून कोरोनाकाळात कमी झालेली प्रवासी संख्या हळूहळू पूर्ववत होत आहे.
घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणार्या मुंबई मेट्रो वनची कोरोनामुळे कमी झालेली प्रवासी संख्या हळूहळू वाढत चालली आहे. सध्या मुंबई मेट्रो वनने 3.15 लाख प्रवासी प्रवास करीत असून तीनश फेर्या चालविण्यात येत आहेत. पिकअवरला दर 4 मिनिटांनी तर नॉन पिकअवरमध्ये 6 ते 9 मिनिटांनी एक ट्रेन चालविण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या डब्बे वाढविण्याची गरज नाही
मुंबई मेट्रो वनने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या कोरोनापूर्व काळात चार लाखाच्या पार गेली होती, त्यामुळे तिचे डब्बे चार वरून सहा करावेत असा प्रस्ताव होता. परंतू सध्या रोजची प्रवासी संख्या सुमारे तीन लाख झाली असली तरी भविष्यात मेट्रोला वाढता प्रतिसाद पाहून चार डब्यांच्या ऐवजी सहा डब्यांच्या ट्रेन चालविणार का असे विचारले असता कोरोना पूर्वकाळात आम्ही सध्याच्या चार डब्यांच्या ट्रेनद्वारेच साडे चार लाख प्रवाशांची वाहतूक केली होती. त्यामुळे तेवढे प्रवासी वाढल्यावर डबे वाढविण्यावर विचार होईल अशी माहिती मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.



























































