
राज्यात शंभर टक्के कोविड लसीकरण होताच कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले पहिली ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. संबंधीत निर्णय आज जाहिर करण्यात आला असून उद्यापर्यंत परिपत्रक जारी होणार आहे.
पहिली ते 12वी पर्यंतचे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात येणार आहेत, राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेण्यात आला अहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गा नंतर राज्य सरकारने सर्व शाळा बंद केल्या होत्या. सरकारच्या आदेशा नंतर राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. हा आदेश 15 फेब्रुवारीपर्यंत लागू राहिल असे सांगण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीला नवा अध्यादेश निघणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 17 फेब्रुवारी पर्यंत शाळांबाबत निर्णय झालेला नव्हता.

























































