Google pay चे नवे अपडेट, आता पेमेंट करणे अधिक सोपे… वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Google pay ने हिंदुस्थानातील यूजर्सला मोठे गिफ्ट दिले आहे. Googleने त्यांच्या डिजिटल पेमेंट अॅप GPay मध्ये आता हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण असलेली हिंग्लिश (Hinglish) या भाषेचा समावेश केला आहे. 2021 मध्ये googleने देशामध्ये घेतलेल्या इव्हेंटमध्ये याची घोषणा केली होती. आता हे नवे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हिंग्लिशमध्ये, तुम्ही UPI आधारित Google Pay अॅपवर इंग्रजीमधील माहिती हिंदीमध्ये वाचू शकाल. Google Pay वापरकर्ते या अॅपवर Hinglish चा पर्याय सहज निवडू शकतील. तसेच ही प्रक्रिया खूप सोपी असेल. हिंग्लीश भाषेसोबतचं google ने आता एकूण 10 भाषांचा समावेश या अॅपमध्ये केला आहे. यात इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामीळ आणि तेलगु या भाषांचा समावेश आहे.

आता जर तुम्हाला पेमेंट अ‍ॅपमध्ये भाषा बदलायची असेल तर नेमकं काय करावं लागणार ते जाणून घेऊयात…
  • सर्वप्रथम Google Pay अ‍ॅप Apple App Store किंवा Google Play Store मधून लेटेस्ट व्हर्जन अपडेट करुन घ्या.
  • त्यानंतर Google Pay अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
  • अ‍ॅपमध्ये उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला प्रोफाइल आयकनवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जा.
  • मग Personal Info या पर्यायावर क्लिक करा.
  • यात तुम्हाला भाषा निवडीचा पर्याय दिसेल.

इथून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकाल. याचसोबत गुगलने आपल्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.