डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार्थींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थीं समाजाचे आदर्श आहेत. त्यामुळे आपण केलेल्या मागण्या पूर्ण करण्यास सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, प्रभाकर फुलसुंदर महाराज, स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र माने गुरुजी, मंगलाताई शेवकरी, काशिनाथ चौधरी, विलास वनशिव, नासिकेत पानसरे, शंकर खुळे, मोहमद काशिम बावला आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थींना एसटीच्या सर्व प्रकारच्या निमआराम व आराम गाडय़ांसह शिवनेरी, शिवशाही तसेच भाडेतत्त्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवासास मान्यता देण्यात यावी.