
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आज पहिली मदत जाहीर झाली. 151 तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 2900 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना मदतीची रक्कम दोन टप्प्यांत मिळणार आहे. ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 31 मार्चपूर्वी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा दावा सरकारने केला आहे. आचारसंहिता घोषित झालेल्या 264 ग्रामपंचायतींना तूर्तास ही मदत मिळणार नाही.
अशी मिळेल मदत…
दुष्काळामुळे दोन हेक्टर क्षेत्रात 30 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर दोन टप्प्यांत 6800 रुपये.
हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना 3400 रुपये.
बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत 18 हजार रुपये.
पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 9 हजार रुपये.
फळबाग शेतकऱ्यांना किमान 2 हजार रुपये.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संख्या
हंगामी पीक घेणारे आणि दोन हेक्टर क्षेत्र असलेले पात्र शेतकरी – 2138970
फळबाग आणि दोन हेक्टर क्षेत्र असलेले पात्र शेतकरी – 808055





























































