शिवसेनाप्रमुखांना ग्रॅण्ड हयातमधील कर्मचाऱ्यांनी वाहिली आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय कामगार सेनेच्या वतीने ग्रॅण्ड हयात येथे आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, चिटणीस मनोज धुमाळ यावेळी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईतील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यावेळी उपस्थित होते. त्यांनी पुष्पहार अर्पण करून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन केले. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारला. त्यामुळेच सरकारी आस्थापना, बँका आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी तरुणांना नोकरीची कवाडे खुली झाली. या आस्थापनांत मराठी आवाज घुमला. आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत भारतीय कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती कामगारांच्या हितांसाठी भक्कमपणे उभी ठाकलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेमुळेच या आस्थापनांत मराठी कामगारांचा आवाज बुलंद झाला असून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांनी आपल्या साहेबांना श्रद्धांजली वाहिली. ग्रॅण्ड हयातमध्ये भारतीय कामगार सेनेने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले.

शिवसेना खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख व आमदार अॅड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, सरचिटणीस सचिन अहिर, श्रीधर पाटणकर, माजी महापौर महादेव देवळे, विश्वनाथ महाडेश्वर, श्रद्धा जाधव, चिटणीस योगेश आवळे, राम साळगावकर, प्रकाश नाईक, जीवन कामत, संजय सावंत, सुबोध आचार्य, आमदार संजय पोतनीस, विभागप्रमुख महेश सावंत, माजी नगरसेवक सगुण नाईक, सदा परब, दिनेश कुबल, पोलीस उपायुक्त पैलासचंद्र आव्हाड, पनवेल शहर संघटिका अपूर्वा प्रभू, दिलीप मोरे, कालिना विधानसभा संघटिका संजना मुणगेकर यांनी यावेळी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन केले. सागर मोरझारीया, सुनील धुमाळ, रमेश मासडे, श्रीराम नंदनवार यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.