
लॉकडाऊनमुळे ग्रंथाली प्रकाशनाने गेल्या वर्षीप्रमाणे आताही डिजिटल कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘साहित्याच्या पारावर’ या साप्ताहिक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केल्यानंतर ग्रंथालीने आता ‘ग्लोबल साहित्यसफर’ हा नवा उपक्रम ‘ग्रंथाली वॉच’ या युटय़ूब चॅनेलवर सुरू होणार आहे.
‘ग्लोबल साहित्यसफर’मध्ये राजीव श्रीखंडे एका अभिजात जागतिक पुस्तकाची ओळख करून देणार आहेत. यामध्ये इंग्रजीसह विविध देशांतील उत्कृष्ट साहित्यकृतीचा परिचय करून देतील. हा कार्यक्रम दर महिन्याला दुसऱया व चौथ्या शनिवारी प्रसारित होईल.
येत्या 10 एप्रिल रोजी ‘ग्लेबल साहित्यसफर’चा पहिला भाग सायंकाळी 6 वाजता प्रसारित होईल. ‘साहित्याच्या पारावर’ हा कार्यक्रम 9 एप्रिलपासून दुसऱया व चौथ्या शुक्रवारी दुपारी 4 वाजता प्रसारित होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी, 13 एप्रिल रोजी ‘पायाला भिंगरी’ हे नवीन सदर या चॅनेलवर सुरू होईल. मेधा आलकरी जगभरातल्या विविध स्थळांची अनोखी माहिती यातून मांडणार आहेत.





























































