गुडसुर येथील सरपंचासह पाच अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। गुडसुर

येथील ग्रामपंचायत मधील सरपंच व इतर पाच सदस्यांचे सदस्यत्तव रद्द करण्यात आले आहे. जिल्हा अधिकारी लातूर यांनी गुडसुर ग्रामपंचायतचे सरपंच मुस्कावाड बेबीनंदा चंद्रकांत यांच्यासह सदस्य असणारे लंजीले दैवशाला राजपाल .कमलबाई बाबुराव सुर्यवशी.देमगुंडे पार्वती बालाजी .यमुनाबाई मारोती सुर्यवंशी .गवळणबाई भाणुदास एकुर्के या सर्व सदस्यचे जात वैधता प्रमाण पञ मुदती मध्ये सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्तव रद्द केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची या निर्णयामुळे गुडसूर मध्ये खळबळ उडाली आहे आता पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागणार असे चित्र दिसून येत आहे.