
क्रिकेटच्या मैदानापेक्षा वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेत राहणं हे क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला नवीन नाही. टॉक शोमधून आक्षेपार्ह कमेंट्स करणं असेल किंवा सतत अनफिट असणं असेल, हार्दिक पांड्या सतत भलत्याच कारणावरून चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी त्याला झोडपला आहे.
हार्दिकने नुकताच एक फोटो त्याच्या ट्विटरवर शेअर केला. त्यात तो त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबत दिसत आहे. त्यावर त्याने पांड्याज आर हिअर अशी कॅप्शन टाकून मुंबई इंडियन्स या संघाच्या पेजला टॅग केलं आहे. पण, या फोटोतल्या त्याच्या अवताराने नेटकरी चांगलेच खवळले आहेत.
The Pandyas are here Now let’s get this show on the road @mipaltan pic.twitter.com/x4bT28WawY
— hardik pandya (@hardikpandya7) August 26, 2021
या फोटोंमध्ये या दोघांनीही नाईट सूटसारखे दिसणारे कपडे घातले आहेत. त्यावर त्यांनी घातलेल्या चपला, बॅग्ज असा सगळाच जामानिमा पाहून ते झोपेतून उठले असावेत किंवा झोपायला चालले असावेत असं दिसतंय.
The picture clearly depicts “Money can buy you luxury, but not the senses”
— Kiranraj (@kp_3661) August 26, 2021
त्यांची ही फॅशन नेटकऱ्यांना काही पसंत पडली नाही. त्यांनी त्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पैसा बक्कळ असला तरी त्याने अक्कल विकत घेता येत नाही, असा शेलका टोलाही नेटकऱ्यांनी पांड्या बंधुंवर हाणला आहे.




























































