
मुंबईतील ड्रग्ज पार्टीची घटना दोन मृत्यूंमुळे उघड झाली; परंतु मुंबईतच नाही, तर राज्याच्या कानाकोपऱयात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे. भाजप महायुतीच्या सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
मुंबई पोलीस आणि सरकारी यंत्रणाच्या नाकावर टिच्चून अशा ड्रग्ज, दारूच्या पाटर्य़ा खुलेआम होत असून हे गृह विभाग तसेच सर्व यंत्रणांचे मोठे अपयश आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकण्यास भाजप महायुती सरकारचा आंधळा कारभार जबाबदार आहे असे ते म्हणाले.


























































