लॉकडाऊनच्या मंदीत शोधली संधी! मधुमक्षिका पालन करून केली 20 लाखांची उलाढाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे गतवर्षी अनेकांना रोजगार गमवावा लागला. तर काहींनी स्वतःहून नोकरीला रामराम ठोकत आपला बिझनेस उभा केला अन् त्यात यशही मिळवलं. त्यापैकीच एक म्हणजे हरियाणाचे नरेश झांग. डिजीटल मार्केटिंगची नोकरी सोडून नरेश यांनी मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरात त्याने तब्बल 20 लाख रुपयांची उलाढाल केली आहे.

हरियाणातील हिस्सार जिह्यातील नरेश यांनी लॉकडाऊनमध्ये मधुमक्षिका पालन करण्यासोबत मधाचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक स्टार्टअप सुरू केले. त्याच्या कंपनीचे नाव स्क्रॉलिंग आहे. डिजीटल मार्केटिंगमधील अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांना कंपनीच्या उत्पादनांची विक्रीसाठी त्याचा मोठा फायदा झाला. वर्षभरात त्यांच्या कंपनीची उलाढाल लाखोंच्या घरात पोहोचली आहे.

सहा फ्लेकरचे मध, महिन्याला 200 हून अधिक ऑर्डर

  • नरेश झांग यांच्या कंपनीतून सहा फ्लेकरचे मध तयार केले जाते. तीन ते चार
  • महिन्यांमध्ये सात क्किंटल मधाचे उत्पादन झाल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्कनोंदणी
  • पद्धतीने ते ऑर्डर स्कीकारतात, महिन्याकाठी त्यांना साधारण 200 ते 300 ऑर्डर मिळतात.
  • त्यांच्याकडे 170 मधपेटय़ा असून एका मधपेटीतून त्यांना 15 किलो मध मिळते.