एचडीएफसी, कॅनरा बँकेचे व्याजदर महागले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने व्याजदर वाढवले आहेत. एचडीएफसी बँकेने कर्जदर 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. 7 जून 2022 पासून नवीन कर्जदर लागू झाला असल्याचं बँकेकडून जाहीर केले आहे. यामुळे कर्जदारांच्या हफ्त्यात आता वाढ होणार आहे तसेच गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जदेखील महागणार आहे. दरम्यान, कॅनरा बँकेने एका वर्षाच्या मुदतीतील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 0.05 टक्के वाढ करून 7.40 टक्के इतका कर्जदर केला आहे. बँकेने सहा महिन्याच्या मुदतीसाठीच्या एमसीएलआरमध्येही वाढ करत 7.30 टक्क्यावरून 7.35 टक्के इतका केला आहे.