Health Tips – बडिशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणानंतर बडिशेप खाण्याची सवयी आहे. काही जण बडिशेपचा उपयोग हा जेवणात मसाल्याप्रमाणेही करतात. बडिशेपचा फक्त मुखवास म्हणूनच उपयोग नाही, तर याचे आणखीनही औषधी फायदे आहेत. आज आपण याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

बडिशेप खाण्याने होणारे फायदे

– खोकला झाल्यास जर तुम्ही बडिशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडिशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.

– बडिशेप खाल्ल्याने मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमची मासिक पाळी वेळेवर येत नसतील तर बडिशेप आणि गूळ खा.

– ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडिशेप खूपच परिणामकारक आहे. जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडिशेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.

– बडिशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

– ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडिशेप मिक्स करून दूधातून घावी.

– पोटात दुखत असल्यास बडिशेप खाल्ल्यास फरक पडतो. पण लक्षात घ्या ही बडिशेप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडिशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.

– जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडिशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना निकिता यांनी ही माहिती दिली.