पहिल्याच पावसात अहमदाबाद बुडाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमधील अहमदाबादमध्ये  मान्सून बरसला.  सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने अनेक भागांत पाणी साचले होते. शहरातील रस्ते जलमय झाले हेते तर सखल भागांतील अनेक घरांत पाणी घुसले. पहिल्याच पावसात अहमदाबाद जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले.

सुरत, तापी, वलसाड, नवसारी, दमण, दादरा– नगर हवेली या भागांत सोमवारीही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर गुजरात, कच्छ, सौराष्ट्र भागांत आठवडाभरात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, उमरगावमध्ये सर्वाधिक १६७ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.