मालवणला पावसाने झोडपले

31

सामना प्रतिनिधी। मालवण

गेले चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी पावसाने मालवणला झोडपून काढले. पावसाच्या जोरदार सरींनी जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

पावसाचा जोर वाढल्याने सिंधुदुर्गातील बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना वेग आला असून सर्वत्र लावणीच्या कामांना जोर दिसून येत आहे. नदी नालेही दुथडी भरून वाहत आहेत. समुद्रही खवळला असून जोरदार लाटा उसळत आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर अरबी समुद्रातही कमजोर स्वरूपातील एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, आगामी ३ ते ८ जुलै या दरम्यान कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल अशी माहिती मुंबई हवामान विभाग तज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या