मुंबई, ठाणे, पुण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

मुंबईसह ठाणे आणि पुण्यात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबईतील हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी पावसाचा आजचा अंदाजही व्यक्त केला होता. उद्या मंगळवारी मुंबई व ठाणे जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल असे होशाळीकर यांनी म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात ईशान्येला कमी दाबाचा पट्टा सक्रीय होण्याची शक्यता असल्यानेच हा पाऊस होऊ शकतो. कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या