रायगडला पावसानं झोडपलं, एक जण नदी वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

गेले काही दिवस गायब झालेल्या पावसानं आज अचानक जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे रायगडच्या पेण, रोहा भागात पाच तासांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे नद्यांना पूर आला असून पेणमधील एक तरुण भोगावती नदीत वाहून गेल्याची माहिती मिळते आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भोगावती नदीमध्ये चार मित्र मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढला आणि नदीला पूर आल्यानं अनिकेत वासकर नावाचा तरुण वाहून गेला. सध्या तो बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे.