
उदय जोशी । बीड
दोन आठवड्यांच्या उघडीपीनंतर एकदा सक्रीय झालेल्या पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली. शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारीही सुरुच होता. काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून गेले होते. अखेर शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला.
महाराष्ट्राला पावसाने झोडपले, देशात सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये
निसर्गाचा चमत्कार, २४ तासाच्या आत कोरड्या नदीला पूर आला
शनिवारी सकाळपासून आकाशातील ढगांच्या गर्दीमुळे प्रचंड उकाडा पासवाचे सुप्त संकेत देत होता. दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. बीड, शिरूर तालुक्यासह मांजरसुभा नेकनूर भागामध्ये पावसाने जोर धरला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

तुफान पावसामुळे बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बस स्थानकात पाणी घुसल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.




























































