बॉलीवूडला बदनाम करू नका! जया बच्चन यांच्या भूमिकेचे हेमा मालिनींकडून समर्थन

1051

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी बॉलिवूडचे समर्थन केले आहे. काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणे किंवा सगळ्यांना ड्रग्जशी जोडणं चुकीचं आहे. कपड्यांवर एखादा डाग लागतो, परंतु धुवून तो स्वच्छ करतात. बॉलिवूड इंडस्ट्री खूप चांगली आणि सुंदर आहे, असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, केवळ बॉलिवूडबद्दलच का बोललं जातंय. कित्येक इंडस्ट्रीमध्ये असं होतं. आपल्या इंडस्ट्रीत देखील होत आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे. या प्रकारे बॉलिवूडवर निशाणा साधला जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. आपली इंडस्ट्री खूप चांगली आणि सुंदर आहे. कला आणि संस्कृतीचा हा उद्योग आहे. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, ज्यांच्यात इतकी हिंमत नव्हती. ते आजकाल कोणत्याही गोष्टींबद्दल बोलत आहेत. कोणत्याही कलाकाराबद्दल बोलत आहेत. हे बघून खूप दुःख होत आहे. मोठमोठ्या कलाकारांनी येथे काम करून नाव कमावले आहे. तुम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे. मी अनेक वर्षे या इंडस्ट्रीत आहे. मला खूप प्रेम आणि नाव मिळाले आहे. कुणी इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलले तर मी पाहू शकत नाही.

काय म्हणाल्या जया बच्चन
बॉलीवूडमधील कलाकारांवर सोशल मीडियात वाट्टेल ती टीका केली जात आहे. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत. चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे निंदनीय आहे. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये.

नेपोटिझमने कुणी यश मिळवत नाही
नेपोटिझमवर हेमा मालिनी म्हणाल्या, आमच्यावेळी नेपोटिझमसारखे काही नव्हते. आम्ही आमच्या दमावर पुढे आलो. मेहनत केली, नाव कमावले. सर्व कलाकार आपापली ध्येयं ठरवून येतात. कुणीही कुणाला बनवू शकत नाही. हो, पण संधी देवाच्या कृपेनेच मिळते. अनेक प्रोड्युसरनी आपल्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मुलेही फिल्म इंडस्ट्रीतील आईवडिलांप्रमाणे फिल्डमध्ये यशस्वी होण्याची इच्छा बाळगतात. पण सर्वच यशस्वी होत नाहीत.

जया बच्चन संसदेत जे बोलल्या ते बरोबर आहे. ज्याला आपण बॉलिवूड म्हणून ओळखतो. ही देशाची सुपर सॉफ्ट पावर आहे. बॉलिवूडने देशाविषयी आपुलकी वाढवण्यात एका राजदूतप्रमाणे काम केले आहे.र- संजय खान, ज्येष्ठ अभिनेता

जया बच्चन यांनी मंगळवारी मांडलेली भूमिका खूपच कणखर होती. त्यांना आणि त्यांच्या भूमिकेला सादर प्रणाम. ज्यांना माहिती नाही त्यांनी पाहून घ्या, पाठीचा कणा असा दिसतो.र्
– अनुभव सिन्हा, दिग्दर्शक

जेव्हा लोक अशाप्रकारे बॉलिवूडचे नाव घेतात तेव्हा अपमानित असल्याचे जाणवते. आम्हाला देशद्रोहीपासून राष्ट्रद्रोहीही म्हटले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही.र्
– गुलशन दवैया, अभिनेता

आम्ही नेहमीच पुढाकार घेतला. जागरूकता अभियानात ठामपणे उभे राहिलो. कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा एक महिला इंडस्ट्रीच्या बाजूने बोलत आहे. र्
– तापसी पन्नू, , अभिनेत्री

आपली प्रतिक्रिया द्या