
भंडाऱयात एका कोंबड्याला चक्क दारूचं व्यसन लागलंय. दारू घेतल्याशिवाय कोंबड्याच्या घशाखाली अन्नपाणीही जात नाही. त्यामुळे मालकाला चांगलाच आर्थिक भुर्दंड पडत आहे. कोंबड्याच्या व्यसनामुळे मालक चिंतेत आहे. त्यांनी कोंबड्याची दारू सोडवण्यासाठी विविध उपाय सुरू केले आहेत.
भंडारा शहराजवळील पिपरी पुनर्वसन गावात भाऊ कातोरे राहतात. त्यांचा कुक्कुटपालनाचा छंद आहे. एका कोंबड्याच्या वाईट सवयीमुळे चिंताग्रस्त आहेत. कोंबडा पाणी पीत नाही. पाण्यात दारु मिसळून दिली की, तो झटकन पितो. अन्नही खातो. आता तर तो दारू प्यायल्याशिवाय अन्नपाण्याला हात लावत नाही. त्यामुळे कातोरे यांना दर महिन्याला दोन हजार रुपयांचा खर्च होतोय.


























































